‘चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे !’ हसन मुश्रीफ यांची जीभ घसरली

Hasan Mushrif-Chandrakant Patil

कोल्हापूर :- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादांना काय बोलावं हे कळत नाही. त्यांना मस्ती आली आहे, असे धक्कादायक वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यात जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाही तर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करून मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहात नाही, असे पाटील म्हणाले होते.

चंद्रकांतदादांना मस्ती आली आहे. दादांनी आधी छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना तंबी दिली होती. हे बरोबर नाही. दादांवर आता चांगलं कार्टुन आलं आहे. आपलं हसं होऊ नये म्हणून दादांनी आता अशी वक्तव्य करणं टाळावं, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुश्रीफ यांनी परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. परिवहनचे निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील याने अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली आहे. हा परमबीर सिंग यांचा दुसरा भाऊच दिसतो, असं सांगतानाच खाकी वेशातील हे दरोडेखोरच आहेत, अशी टीका त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button