हसन मुश्रीफ म्हणजे सत्ताधाऱ्यामधील विरोधी नेते : प्रवीण दरेकर

Hasan Mushrif-Praveen Darekar

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना आठवड्याला काहीतरी बोलावे लागते. भलेही विषय त्यांच्याशी संबधित असो अथवा नसो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे फारशा गांभीर्याने पाहण्याची गरज वाटत नाही. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणजे सत्ताधाऱ्यांमधील विरोधी पक्षनेता आहेत, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी गुरुवारी लगवाला.

दरेकर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले असता ते शासकीय विश्रामगृहात गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली.

राज्यात अनेक घडामोडी घडत असतात. सरकारच्या कारभारावर टीका करणे हे विरोधक म्हणून भाजपचे काम आहे. महाविकास आघाडीत गोंधळ असल्याने हे सरकार पडेल हे निश्चित आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात सत्तांतर होणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्गात वक्तव्य केले होते. यासंदर्भाने मुश्रीफ यांनी शहा यांच्यावर टीका केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. दरेकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ बोलत आहेत हे आमच्या लक्षात आहे. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. मुळात विषय आपल्यशी संबंधित असो अथवा नसो ते बोलत असतात. किंबहुना त्यांना बोलावे लागते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER