जिथे ताकद तिथे स्वबळ वापरु ; राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका

Hassan Mushrif-Satej Patil-hasan mushrif

मुंबई :- कोल्हापूर महापालिका निवडणुकांमध्ये चांगलीच रंगात पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना स्वबळाच्या भाषेवरुन कोल्हापुरात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे.

शिवसेना नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आधी स्वबळाचा नारा दिल्याचा दावा काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही दंड थोपटले आहेत. जिथे शक्य असेल तिथे राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आणि जिथे स्वबळाची ताकद असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवू, असे मुश्रीफ यांनी जाहीर केले .

दरम्यान कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सगळेच पक्ष वेगवेगळे लढण्याची भाषा करत आहेत. पदवीधर-शिक्षक मतदारसंघात आपण एकत्र निवडणुका लढवल्या. जिथे शक्य तिथे महाविकास आघाडी करण्याची गरज आहेच. परंतु विशिष्ट परिस्थितीत तसं करता येणार नाही. मी, हसन मुश्रीफ वगैरे वरिष्ठांशी बोलूच. तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एकत्र निवडणूक लढवल्यास आमच्यातीलच एक-एक बाजूला जायला वेळ लागणार नाही, असे सतेज पाटील कोल्हापुरात भाषणादरम्यान म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचे बोट धरुन विधानसभेत आल्याचा सतेज पाटील यांना विसर ; ‘स्वबळा’च्या आरोपांनंतर राजेश क्षीरसागर संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER