हसन मुश्रीफांना सहकार्यांपेक्षा आमच्यावरच अधिक विश्वास : देवेंद्र फडणवीस

सातारा : राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांचा माझ्यावर विश्वास आहे. काही कामे आम्हीच करु शकतो असा त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच कर्नाटक सरकारला अल्मत्ती बाबत आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्या बाबत आम्ही विनंती करावी असे त्यांना वाटते अशी कोपरखळी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुश्रीफ यांना हाणली.

कर्नाटकात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवावा तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये असे येडीयुरप्पा यांना सांगावे, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी तुम्हाला केले असल्याबाबत विचारले असता आ. देवेंद्र फडणवीस सातारा येथे पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसच्या आमदारांनी पुतळा बसवू दिला नसून ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तुम्हीच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगण्याऐवजी ते सहकारी पक्षाला का सांगत नाहीत? पुतळा बसवण्यासाठी मी नक्की सांगेन. महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी त्याठिकाणी जावून आंदोलनही करेन. तो प्रश्नच नाही. उगीच राजकारण कशाला करायचे, असेही ते म्हणाले.

तुमच्या दौऱ्यासाठी सर्वजण उपस्थित असताना राज्यसभेचे खासदार दिसत नाहीत, असे विचारले असता विरोधी पक्षनेते आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले, रात्रीच त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. त्यांना कणकण आहे. आजारी असल्यामळे उपस्थित राहिले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER