महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की भाजपचे डोळे पांढरे होतील- हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

मुंबई :- शरद पवारांचे केंद्राचे पॅकेज अपुरे असणे म्हणणे त्यावर फडणवीसांनी राज्यानेही असे एखादे पॅकेज घोषित करावे असा दम भरणे आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या मागणीला प्रतिसाद देणे हा राज्याच्या सामान्य जनतेसाठी उत्तम योगायोगच म्हणावा असे आहे. कारण राजकारणाशी सामान्यांना काही घेणे-देणे नाही. त्यांना सध्या मदतीची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांचे हे आश्वासक विधान राज्याच्या जनतेसाठी आशादायी ठरले आहे.

महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की भाजपचे डोळे पांढरे होतील, असे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

केंद्राने २० लाख कोटी जाहीर केले, मात्र हे कसलं पॅकेज आहे? सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की यांचे (भाजपचे) डोळे पांढरे होतील, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

भाजपा महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र आधीच राज्याचे जीएसटीचे पैसे केंद्राकडे आहे. ते सोडाच, पण पीएम केअरमधून महाराष्ट्राला किती पैसे दिले? जेव्हा की, सर्व पैसे मुंबईतून पीएम केअरला गेले तरीही फक्त ४०० कोटी रुपये महाराष्ट्राला मिळालेत.  त्याउलट उत्तरप्रदेशला १५०० कोटी रुपये दिले गेले. केंद्रातील भाजपचा हा कुठला न्याय? असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER