योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut - Yogi Adityanath

मुंबई : मुंबईचा चेहरा असलेल्या फिल्मसिटीचा (Mumbai Film City) उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) हलवण्याची चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath Mumbai Visit) हे फिल्मसिटीबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही योगींनवर टीकास्त्र सोडले . देशात फिल्मसिटी काय फक्त मुंबईतच आहे का? तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे. तिकडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला . ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते .

उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, अशी कोपरखळी लगावतानाच मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. अनेक वर्षाची मेहनत आणि कष्ट त्यामागे आहेत. योगी मुंबईत आले. तसे तामिळनाडूतही जाणार आहेत का? तिकडेही मोठी फिल्मसिटी आहे. की फक्त योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय? असा सवाल राऊत यांनी केला .

जलसा, प्रतिक्षा आणि रामायण ही केवळ बंगल्यांची नावं नाहीत तर ते फिल्मसिटीचं वैभव आहे. हे वैभव सुद्धा तिकडे घेऊन जाणार आहात का? असा सवाल करतानाच काही वर्षांपूर्वी नोएडामध्ये फिल्मसिटी उभी राहिली होती. तिचं काय झालं ते आधी सांगा, असेही ते म्हणाले.

तुम्ही फिल्मसिटी उभी करण्यासाठी भिंती उभ्या कराल. पानंफुलं लावाल. पण सुरक्षेचं काय? मुंबईसारखी सुरक्षा तुम्ही देऊ शकणार आहात का? फिल्म सिटीबरोबर मुंबईची व्यवस्थाही घेऊन जाणार आहात का? असा सवाल करतानाच शेवटी मुंबई ही मुंबई आहे. फिल्मसिटी उत्तर प्रदेशात घेऊन जाणं मस्करी वाटते काय? असेही राऊत म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER