राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय का?

Has Corona re-emerged in the state?

कोरोना विषाणूवरील लसीकरणाला मागच्या महिन्यात मोठ्या धामधुमित सुरुवात करण्यात आली. मोठ्याप्रमाणात नोंदण्या करण्यात आल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांना लसी देण्यात आल्यानंतर आता फ्रंट लाईन वर्कर्सना कोरोनाची लस (Corona vaccine) देण्यात येतीये. पण सामान्यांसाठी लस कधी मिळणार ? याची वाट सर्वसामान्य नागरिक पाहतो आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढताना दिसतोय.

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार गेल्या काही दिवसात कमी झाला होता. कोरोना जणू संपलाच असा विश्वास लोकांना येत असतानाच पुन्हा अस्वस्थ करणारी बातमी येतीये. कोरोना रुग्णांचा आकडा फुगताना दिसतोय. मुंबईतून ही धक्कादायक माहिती समोर येतीये. १ फेब्रुवारीला सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे उघडले. यानंतर पहिल्याच आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. तर दुसऱ्या बाजूला विदर्भातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीये.

मुंबईत या महिन्याच्या सुरुवातीला फक्त ३२८ नवे रुग्ण होते पण गेल्या १० दिवसात हा आकडा ४२३७वर गेला. मुंबईच्या चर्चगेट, दादर, कुर्ला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिल्सवर वाढती गर्दी कोरोनाच्या प्रसाराचं कारण तर ठरणार नाही ना? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाता आहेत. लोकलमुळं वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबई मनपानं लोकलच्या प्रवाशांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिलेत.

विदर्भातही कोरोनाचा प्रसार

विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झालीये. ११ फेब्रुवारीला एकाच दिवसात ३१५ नवे कोरोनाग्रस्त आढळले. जिल्हाधिकारी किशोर नवल यांनी वेळीच सावध भूमिका घेत अमरावती (Amravati) जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतील, अशी ठिकाणे जाहीर करुन तिथं योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिलेत.

प्रमुख बाजारपेठा १८ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आल्यात. जिल्ह्यातील महाविद्यालये सुरु होणार होती ते आता पुढं ढकलण्यात आले आहेत.

लसीकरणाला होतीये दिरंगाई

लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लसीबद्दल नागरिकांच्या मनात साशंकता आहे. मागच्या महिन्यात नोदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील लस घ्यायला नकार दिला होता. त्यानंतर सर्व्हरला प्रॉब्लेम असल्यामुळं लसीकरणाचा वेग मंदावला होता. राज्य सरकार कर्मचाऱ्यांना विश्वास घ्यायला कमी पडतं का? असा सवालही त्यावेळी उपस्थीत केला गेला.

सामान्य लोकांना लस अजूनही देण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळं बहूसंख्य लोक कोरोनाच्या लसीकरणापासून दूर आहेत. शिवाय सध्याच्या बदलत्या हवामानाचाही विषाणू प्रसारावर परिमाण होवू शकतो. कोणत्याही साथीचे आकडे स्थिरावत नाहीत. ते वेळोवेळी बदलत असातात. कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळं चिंता वाढवून घेऊ नये, असं आवाहनही डॉक्टरांकडून केलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER