कोव्हॅक्सिन घेऊनही हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण

Anil Vij

चंदीगड :- कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनिल विज यांनी गेल्याच महिन्यात चाचणीदरम्यान कोव्हॅक्सिनची लस घेतली होती. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेत भर पडली आहे. अनिल विज यांनी स्वत: ट्विटरवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. याशिवाय संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहनही केलं आहे.

अनिल विज यांनी ट्विट करून आपल्याला कोरोना (Corona) झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “माझी कोरोना चाचणी करण्यात आली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सरकारी रुग्णालय अंबाला इथं दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.” लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाली.

यानंतर चर्चेला सुरुवात होताच, कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यासंदर्भात भारत बायोटेकने एक निवेदन जारी केले आहे. यात, कोव्हॅक्सिनच्या दोन  ट्रायलचे शेड्यूल आहे. दोन डोस २८ दिवसांत द्यायचे आहेत. दुसरा डोस १४ दिवसांनंतर द्यायचा आहे. यानंतरच याची एफिकेसी समजेल. दोन डोस दिल्यानंतरच ही लस (कोव्हॅक्सिन) प्रभाव दाखवेल, अशा पद्धतीनेच तिची निर्मिती करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER