मुंबई काय शिवसेनेच्या बापाची का? भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

BJP-Shivsena

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे . या पार्श्वभूमीवर हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री तथा भाजपाचे आक्रमक नेते अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

कंगनाच्या समर्थानात  अनिल विज म्हणाले की , मुंबई काय शिवसेनेचा खानदानी भू-भाग आहे का? का त्यांच्या बापाचा प्रदेश आहे? मुंबई भारताचा भाग आहे. तेथे कुणीही जाऊ शकतो. जे अशा प्रकारच्या धमक्या देतात त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आपण कुणालाही सत्य बोलण्यापासून रोखू शकत नाही, असे ते म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER