कोकणात रेड अलर्ट

harvey rain-Red alert in Konkan

रत्नागिरी : कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत पुढील दोन दिवस जोरदार पावसासह वादळी वार्‍याच्या शक्यतेने किनारपट्टी भागात ‘रेड अलर्ट’ (Red alert) जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी परिसरासह कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पाऊस आणि जोरदार वार्‍यामुळे समुद्रही खवळला आहे.

ही बातमी पण वाचा:- मुंबईत तुफान पाऊस : आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा

पुढील दोन दिवस जोरदार पावसासह वादळी वार्‍याच्या शक्यतेने किनारपट्टी भागात ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. प्रशासनाकडून दुर्गम भागासह किनारी गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या किनारपट्टीलगत असलेल्या जिल्ह्यात मोसमी पावसाच्या अंतिम टप्प्यात वादळी पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला जोरदार (Harvey rain) वार्‍याचीही साथ लाभणार आहे. त्यामुळे कोकणातील जिल्हा प्रशासनांनी दुर्गम भागासह किनारी गावांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही वादळी पावसाच्या शक्यतेला दुजोरा दिला असला तरी संस्थेच्या अंदाजानुसार आज कोकणातील पाऊस ओसरण्याची शक्यता वर्तविली आहे. परतीच्या दमदार पावसामुळे कोकणातील भात शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER