काँग्रेसला सुगीचे दिवस, भाजपच्या असंख्य इच्छुकांची यादी तयार; पटोलेंचा गौप्यस्फोट

Nana Patole

अमरावती : राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन केले. मात्र असे सले तरी आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुद्धा सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षातील अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, त्यांची यादी तयार आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपची चिंता वाढवली आहे.

काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटलं, भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत, माझ्याकडे त्यांच्या नावांची मोठी यादी तयार आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button