माजी आमदार जावयाचे केंद्रीय मंत्री सासऱ्यांवर गंभीर आरोप

harshwardhan-jadhav-critrics-on-rao-saheb-danve

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी शुक्रवारी २९ मे रोजी २० मिनीटांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केला. माझे काही बरे वाईट झाले तर त्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जवाबदार राहतील.

मात्र मी जर माझ्याकडे असलेले त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले तर सगळं पितळ उघडे पडेल. असा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. या वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांचे सासरे राव साहेब दानवे यांच्यावर अनेक कौटुंबिक व राजकीय आरोप केले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी हा व्हिडिओ व्हायरल झाला मात्र, रात्रीपर्यंत रावसाहेब दानवे यांनी या व्हिडिओला उत्तर दिल्याचे पुढे आले नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER