
भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी आझाद मैदानावरील आंदोलक मराठा विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेत अंकिता पाटलांनी आंदोलनाला तसेच विद्यार्थ्यांना समर्थन (Aazad maidan to support maratha student) दर्शविले आहे. विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत.
माझी सरकारला एक नम्रपूर्वक विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या आपण सोडवाव्यात आणि तत्काळ या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी अंकिता पाटील यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या मुंबई-मेट्रो, तलाठी, महावितरण, महानिर्मिती, स्टेट बोर्ड महाराष्ट्र सेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध विभागांतील निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ शासकीय सेवेमध्ये घ्यावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाज आणि विद्यार्थ्यांच्यावतीने १५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आज पुणे जिल्हा परिषद सदस्य आणि इसमा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्ष अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला