मराठा आरक्षणावरून थेट बारामतीतून हर्षवर्धन पाटलांची महाविकास आघाडीवर टीका

Mahavikas Aghadi-Harshvardhan Patil.jpg

बारामती : महाविकाल आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने दिलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडीला टीकवता आले नाही. या सरकारच्या दुर्लक्षामुळेच मराठा आरक्षण रेंगाळले अशी प्रखर टीका भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली आहे. ते बारामतीत बोलत होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सध्याच्या सरकारने योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयात अडचणी निर्माण झाल्या. महाविकास आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळेच, हलगर्जीमुळेच मराठा, धनगर आणि इतर समाजांचं आरक्षण रेंगाळल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला.

तसेच, सध्या राज्यात सामाजीक तेढ निर्माण झाले असून राज्य सरकारने पहिल्यांदा सामाजिक तणाव सरकारने दूर करावा, मग बाकीच्या गोष्टी कराव्यात. आज प्रत्येक समाजात भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागलं आहे. या असमाधानकारक स्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे. याची खबरदारी सरकारने घ्यावी, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

तसेच, सध्याच्या काळात कोरोनाप्रमाणेच शेतकऱ्यांकडेही या सरकारने दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER