‘महाविकास आघाडी फसवे सरकार’; हर्षवर्धन पाटलांची टीका

रेडा :- महावितरणने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केली. काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सक्‍तीची वीज बिल वसुली सुरू केली आहे. वीज तोडणी मोहिमेमुळे पाण्याअभावी शेती पिके जळली आहे. पिण्याच्या पाणीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Agahdi) सरकारने तत्काळ आदेश देऊन कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची भूमिका असायला हवी, मात्र, मविआ सरकार सध्या अडचणीत आहे. शेतकऱ्यांची वीज खंडित करत आहे. या सरकारमधील विविध पक्षांनी संपूर्ण कर्जमाफी व मोफत विजेचे आश्‍वासन दिले होते. परंतु, वीज रोहित्रे बंद करून कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करत आहे. मविआ सरकार हे फसवे सरकार आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. अशा अडचणीतही मोहिमेत आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी वीज बिलाची रक्‍कम भरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास न देता मविआ सरकारने तत्काळ निर्णय घेऊन शेतीचा वीजपुरवठा पूर्ववत करावा.”

इंदापूर तालुक्‍यात अनेक दिवसांपासून वीज तोडणी मोहीम चालू आहे. तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यमंत्री वीज तोडणी मोहिमेबाबत गप्प आहेत. उन्हाळा वाढत असल्याने वीज तोडणी मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या असंतोषाची दखल शासनाला घ्यावीच लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला. गावोगावच्या नळ पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने वीज बिलाअभावी खंडित करू नये, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.

ही बातमी पण वाचा : गोकुळ निवडणूक : पालकमंत्री सतेज पाटलांना धक्का, आघाडीत मोठी फूट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER