मराठा समाजासाठी हर्षवर्धन जाधवांना खासदार बनवायचं आहे – नितेश राणे

Harshvardhan Jadhav wants to become MP for Maratha community - Nitesh Rane

औरंगाबाद : आपल्या राज्यात मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे १४५ आमदार असताना समाजाच्या प्रश्नांसाठी मी आणि हर्षवर्धन जाधव हेच सभागृहात आवाज उठवत होतो. मराठा समाजाच्या हितासाठी ज्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला अशा हर्षवर्धन जाधवांना आता आमदार नाही तर खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे. त्यासाठी लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे, असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले. ते लासूर येथील मराठा समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- संभाजी भिडे सरकारचे जावई आहेत का?- नितेश राणे

यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्याकडून मराठा समाजातील तरुणांनी आणि प्रतिनिधींनी आदर्श घेतला पाहिजे. मराठा समाजाला योग्य न्याय देण्यासाठी समाजाच्यावतीनं आवाज उठवणाऱ्यांंना आपण विधानसभा आणि लोकसभेत पाठवलं पाहिजे आणि यासाठी लागेल ती मदत करण्यास मी तयार आहे, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.