हरमन बावेजा आणि जेनेलियाचा चित्रपट छोट्या पडद्यावर येणार

It's My Life

लॉकडाऊनमुळे (Lockdown) ओटीटी प्लॅटफॉर्म आणि छोट्या पडद्यावरील चित्रपट दाखवणाऱ्या वाहिन्यांकडे प्रेक्षक मोठ्या संख्येने वळला आहे. त्यामुळेच चित्रपट दाखवणाऱ्या वाहिन्यांना ओटीटी प्लॅटफॉमपेक्षा आपल्याकडे जास्त प्रेक्षक वळवण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच नवीन चित्रपटांची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे अनेक तयार झालेले चित्रपट ओटीटीवर आणि छोट्या पडद्यावर दिसले. नव्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो हे पाहून झी नेही अनेक नवे चित्रपट छोट्या पडद्यावर आणि त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले.

बोनी कपूर (Boney Kapoor) आणि त्याचा भाऊ संजय कपूरने (Sanjay Kapoor) 13 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 मध्ये ‘इट्स माय लाइफ’ नावाचा एक चित्रपट तयार केला होता. सुपरहिट तेलुगु चित्रपट बोम्मारिलूची ही अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात ऋतिकप्रमाणे दिसणारा आणि प्रख्यात निर्माता हॅरी बावेजा यांचा मुलगा हरमन बावेजा नायक होता तर नायिका होती जेनेलिया डिसूझा (Genelia D’Souza). हरमन बावेजाचे (Harman Baweja) प्रियांका चोप्राबरोबर (Priyanka Chopra) सूत जुळले होते. दोघांनी एकत्रितरित्या एक-दोन चित्रपटात कामही केले होते. परंतु ते चित्रपट फ्लॉप झाल्याने हरमन चित्रपटसृष्टीबाहेर गेला. त्याच काळात त्याने हा चित्रपट केला होता. या चित्रपटात नाना पाटेकरचीही महत्वाची भूमिका असून प्रख्यात कॉमेडियन कपिल शर्माही महत्वाची भूमिका साकारीत आहे. चित्रपट पूर्ण झाला परंतु प्रदर्शित होऊ शकला नव्हता. परंतु आता 29 नोव्हेंबरला याचा छोट्या पडद्यावर वर्ल्ड प्रीमियर केला जाणार आहे. चित्रपट प्रदर्शित होणे हे महत्वाचे असते आणि हा चित्रपट अखेर काही वर्षानंतर का होईना प्रदर्शित होत आहे याचा बोनी कपूर आणि संजय कपूरला आनंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER