खेळाच्या आणखी एका वेगळ्या क्षेत्रात भारतीय चमकला, हरीत नोहची भरारी

Harith Noah

अलीकडे भारतीय खेळाडू वेगवैगळ्या खेळांमध्ये यश मिळवत आहे. जेहान दारुवालाचे फॉर्म्युला दोन व तीन मधील यश हे अलीकडचे उदाहरण आहे. त्यानंतर आता केरळच्या हरिथ नोहने (Harith Noah) डकार रॅलीमध्ये (Dakar Rally) इतिहास घडवला आहे. सौदी अरेबियाच्या वाळवंटात होणारी आणि जगातील सर्वात अवघड मानल्या जाणाऱ्या या मोटारसायकल रॕलीत हरीत 20 व्या स्थानी आला आहे. या रॅलीत पहिल्या 20 मध्ये येणे हे मोठे यश मानले जाते. भारतीय मोटारसायकलपटूने 12 टप्प्यांच्या या स्पर्धेत प्रथमच असे यश मिळवले आहे. शेर्को फॕक्टरी संघासाठी तो 450 आरटीआर मोटारसायकलवर सहभागी झाला होता. शेवटच्या टप्प्याच्या आरंभी तो 22 व्या स्थानी होता पण शेवटच्या टप्प्यात चांगली कामगिरी करुन तो 19 व्या स्थानी आला. फ्रान्सच्या दिग्गज स्टिफन पीटरहॕन्सल याने विक्रमी 14 व्यांदा डकार रॕली जिंकली.

हरीत हा जर्मनीत जन्मला असून त्रिचूर येथे लहानचा मोठा झाला. या 26 वर्षीय मोटार सायकलपटूच्या आधी भारतातर्फे के.पी.अरविंद व सी.एस. संतोष हे डकार रॕलीत सहभागी झाले होते. सांतोष 2018 मध्ये 34 व्या स्थानी आला होता.

आपल्या अनुभवाबद्दल नोह म्हणतो की, यंदा तर काहीच खरे नव्हते. केरळमध्ये एकाच ठिकाणी मी अडकून पडलो होतो पण मी सरावात खंड पडू दिला नाही. त्यानंतर आॕगस्टमध्ये मी युरोपात गेलो आणि अंदाल्युसिया रॕलीमध्ये भाग घेतला. त्या अनुभवाचा बराच फायदा झाला.

2011 मध्ये रेसिंगची सुरुवात केलेल्या नोहने सुपरक्रॉस गटात सातवेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. 2011 व 2012 मध्ये एमआरएफ नॕशनल सुपरक्रॉस चॕम्पियनशीपमध्ये ए व बी अशा दोन्ही गटात तो विजेता ठरला. 2014 मध्ये तो विदेशी एमआरएफ नॕशनल सुपरक्रॉस चॕम्पियनशीपच्या विदेशी गटात विजेता ठरला. 2017 मध्ये भाग घेतलेल्या सहा पैकी पाच स्पर्धा त्याने जिंकल्या. 2018 मध्ये तो पुन्हा राष्ट्रीय विजेता ठरला.

2018 मध्ये तो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झाला. मोराक्को रॕली ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय रॕली होती.

यंदाच्या डकार रॅलीत चौथ्या टप्प्यात हरीतच्या गाडीला अपघात झाला होता. त्यात त्याच्या इंधनाची टाकी फूटली होती त्यामुळे दोन वेळा इंधन भरण्यासाठी त्याचा खोळंबा झाला होता. तरीही त्या टप्प्यात तो 66 व्या स्थानी आला होता.याच टप्प्यात सीएस संतोष हासुध्दा स्पर्धेतून बाद झाला होता.

9 ते 12 या टप्प्यांमध्ये हरीतने आपली कामगिरी विलक्षण सुधारली. या टप्प्यांमध्ये तो अनुक्रमे 17, 16, 18 व 19 व्या स्थानी आला. शेवटी त्याची एकूण वेळ 54 तास 58 मिनीटे 05 सेकंद राहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER