हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे निधन

Harishchandra Shrivardhankar passes away

कल्याण : मुंबईवर झालेल्या २६-११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याची ओळख पटवणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे घरी निधन झाले. बरेच दिवसांपासून ते आजारी होते.

हरिश्चंद्र श्रीवर्धनकर हे कसाबला ओळखणारे पहिले साक्षीदार होते. कसाबला फाशीपर्यंत पोहचवण्यात हरिश्चंद्र यांची साक्ष महत्त्वाची ठरली होती. उल्लेखनीय म्हणजे कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल याने झडलेल्या दोन गोळ्या हरिश्चंद्र यांच्या पाठीत घुसल्या होत्या. त्यांनी आपल्या ऑफिसच्या बॅगने इस्माईलला मारलेही होते! या झटापटीत त्याच्या गळ्यावर चाकूच्या दोन जखमाही झाल्या होत्या. त्यावेळी हरिश्चंद्र याना माहीत नव्हते की त्यांची कोणाशी झटपट झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील डिसुझा या दुकानदाराला ते रस्त्यावर बेवारस आढळले होते. त्यांनी त्यांच्या मित्राच्या आणि पोलिसांच्या मदतीने हरिश्चंद्र यांची त्यांच्या कुटुंबाशी भेट करून दिली होती.

कल्याण डोंबिवलीचे भाजपा नगरसेवक दया गायकवाड यांनी हरिश्चंद्र यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस कल्याणमधील आयुष हॉस्पिटलमध्ये भेटीला गेले होते. फडणवीस यांनी त्यांच्या उपचारासाठी भाजपाकडून दहा लाखांच्या मदतीची घोषणा केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER