हार्दिक पटेल पवारांच्या भेटीला, लवकरच राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

Hardik Patel to meet sharad Pawar

मुंबई :- राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सुगीचे दिवस आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. आणि हाच धागा पकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत.

सध्या काँग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणात गळती सुरू झाली आहे. काल केरळमधील एका जेष्ठ नेत्याने पक्षनेतृत्वावर गंभीर आरोप करत रामराम ठोकला. तर आज गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी शरद पवारांची भेट घेऊन खळबळ उडवून दिली. मागील काही दिवसांपासून हार्दिक पटेल (Hardik Patel) काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच आज त्याने पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास १ तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. हार्दिक पटेल हे नाराज असून, ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात अशी चर्चा आता सध्या रंगू लागली आहे.

ही बातमी पण वाचा : पवार ऍक्शन मोडवर : मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट नांगरे पाटलांना बोलावले, अर्धा तास चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER