हार्दिक पांड्या तडाखेबंद फलंदाजात ‘टॉप फाईव्ह’मध्ये

Hardik Pandya

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुध्दचा (Australia) पहिला वन डे सामना (ODI) भारताने गमावला आणि हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) शतक त्यात हुकले असले तरी 76 चेंडूत 7 चौकार व 4 षटकारांसह 90 धावा करताना त्याने एक हजार धावांचा टप्पा पार केला आणि वन डे क्रिकेटच्या विशिष्ट टॉप 5 फलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले आहे. हे विशिष्ट टाॕप 5 फलंदाज म्हणजे ते फलंदाज ज्यांनी 100 पेक्षा अधिकच्या सरासरीने 1000 धावांचा टप्पा गाठला आहे.

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एक हजारापेक्षा कमी चेंडू खेळून त्यांनी या हजार धावा केल्या आहेत. हार्दिकने 857 चेंडू खेळताना एक हजार धावांचा टप्पा गाठलाय. याबाबतीत त्याच्या पुढे जे फलंदाज आहेत ते असे…

आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज) -767 चेंडू

ल्युक रोंची (ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड) – 807 चेंडू

शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) – 834 चेंडू

कोरी अँडरसन (न्यूझीलंड) – 854 चेंडू

हार्दिक पांड्या (भारत)- 857 चेंडू

यापैकी ल्यूक रोंची हा विशेष खेळाडू आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी चार आणि न्यूझीलंडसाठी 81 सामने खेळला आहे. याच यादीत आणखी एक भारतीय खेळाडू आहे केदार जाधव 10 व्या स्थानी. त्याने 937 चेंडूत एक हजार धावांचा टप्पा गाठला होता.

एक हजार धावा करताना शंभराच्यावर स्ट्राईक रेट राखणारे तीनच भारतीय फलंदाज आहे. त्यात हार्दिक व केदारशिवाय विरेंद्र सेहवाग आहे. सेहवागचा 8273 धावा करताना स्ट्राईक रेट 104.33 आहे तर केदार जाधवने 101.60 च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत 1389 धावा केल्या आहेत. हार्दिकच्या आता 115.81 च्या स्ट्राईक रेटने 1047 धावा आहेत. सेहवागने त्याच्या एक हजार धावा पूर्ण केल्या तेंव्हा त्याचा स्ट्राईक रेट 37 डावात 99.03 होता तर केदारचा 35 डावात 106.82 स्ट्राईक रेट होता.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या फलंदाजांमध्येही हार्दिक पाचव्या स्थानी आहे. हे टॉप फाईव्ह असे…

आंद्रे रसेल- 130.22

ग्लेन मॕक्सवेल- 123.92

जोस बटलर – 119.05

शाहिद आफ्रिदी- 117.00

हार्दिक पांड्या- 115.81

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER