हार्दिक-नताशा होणार आई-बाबा; सोशल मीडियावरून दिली माहिती

Hardik Pandya - Natasha Stankovic

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच यांचे प्रेम प्रकरण नेहमीच चर्चेत असते. तशातच आता नताशा आणि हार्दिक हे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी रविवारी हार्दिकने इन्स्टाग्रामवरून दिली. हार्दिकने फोटोंची मालिका अपलोड केली, त्यातील पहिलय फोटोत त्याचा बेबी बंपला दर्शवित आहेत. हार्दिकने ते छायाचित्रे पोस्ट करून म्हणाला , “नताशा आणि मी दोघांनी एकत्र खूप चांगला प्रवास केला आहे आणि ते अजून चांगले होणार आहे.” ते म्हणाले, “एकत्रितपणे आम्ही लवकरच आपल्या जीवनात नवीन जीवनाचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत. आम्ही या नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत,,” ते पुढे म्हणाले. या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरच्या घरी लग्न केल्याचाही फोटो शेअर केला आहे, पण त्याबद्दल त्याने माहिती दिली नाही आहे.

हार्दिक पंड्याने 1 जानेवारीला इंस्टाग्राम पोस्टद्वारे नताशा स्टॅनकोविचशी साक्षगंध करण्याची घोषणा केली होती.

हार्दिक आणि नताशा वारंवार त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एकमेकांची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करतात. स्वयंपाक आणि विचित्र संभाषणांच्या चित्रांपासून एकत्रित काम करण्याच्या व्हिडिओंपर्यंत, हार्दिक आणि नतासाने चालू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

गुजरातमधील 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने 2016 मध्ये भारतामध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने देशासाठी 40 टी -20, 54 एकदिवसीय आणि 11 कसोटी सामने खेळले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER