हरभजनची पत्नी आणि अभिनेत्री गीता बसरा दुसऱ्यांदा आई होणार

Maharashtra Today

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh)लवकरच दुसऱ्यांदा पिता बनणार आहे. प्रख्यात अभिनेत्री गीता बसराने करिअरच्या बहरात असतानाच हरभजनशी लग्न करून संसार थाटला होता. एका मुलीचे माता-पिता असलेले हरभजन आणि गीता बसरा आता दुसऱ्यांदा माता-पिता होणार आहेत. गीता बसरा (Geeta Basra) जुलैमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. स्वतः गीतानेच सोशल मीडिया अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

२००६ मध्ये आलेल्या ‘दिल दिया है’ आणि ‘द ट्रेन’ सिनेमात काम केले होते. त्यानंतर हरभजनबरोबर तिचे लग्न ठरले. क्रिकेटरशी लग्न करणाऱ्या नायिकांमध्ये गीता बसराचे नाव घेतले जाते. गीता बसरा आणि हरभजनने २०१५ मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर एक वर्षातच म्हणजे २०१६ मध्ये गीताने एका मुलीला जन्म दिला होता. या मुलीचा जन्म लंडनमध्ये झाला होता. आणि आता ५ वर्षानंतर गीता बसरा पुन्हा आई बनणार आहे. गीताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत हरभजन, गरोदर असलेली गीता बसरा आणि त्यांची मुलगी हिनाया दिसत आहे. हिनायाने हातात एक टीशर्ट घेतलेला दिसत आहे. या टी शर्टवर लिहिले आहे, लवकरच मी मोठी बहिण बनणार आहे. या फोटोसोबत गीताने लिहिले आहे- ‘जुलै 2021 मध्ये येत आहे.’

गीता बसराच्या या पोस्टनंतर या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करणाऱ्या कमेंटस येऊ लागल्या आहेत. नेहा धुपिया आणि सुरेश ‘रैना या दोघांनी हरभजन आणि गीताचे अभिनंदन केले आहे.

ही बातमी पण वाचा : आलियाला वाढदिवसानिमित्त ‘आरआरआर’च्या निर्मात्यांची अनोखी भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER