हरभजनने मागितली बिनशर्त माफी, व्हाटस अ‌ॅप पोस्टमुळे आली नामुष्की

भारताचा यशस्वी फिरकीपटू हरभजनिसंग (Harbhajansingh) याला सोशल मीडियावरील पोस्ट काळजीपूर्वक न पाहता अंदाधुंद फॉरवर्ड करण्याचे प्रकरण अंगलट आले असून बिनशर्त माफी मागावी लागली आहे. दहशतवादी जर्नेल भिंद्रनवाले यांना शहीद संबोधणारी पोस्ट हरभजनकडून फॉरवर्ड झाली होती. त्याच्यामुळे हरभजनच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि त्याच्यावर सोशल मीडियावर जबर टीका झाली होती. त्यानंतर हरभजनने सोमवारी आपला बिनशर्त माफीनामा ट्विटरवर जारी केला असून ती पोस्ट न बघताच फॉरवर्ड केली ही आपली घोडचूक झाल्याचे कबूल केले आहे. आपल्या या पोस्टने देशवासियांच्या भावना दुखावल्या असतील हेसुद्धा त्याने मान्य केले आहे.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेचा ६ जून रोजी वर्धापनदिन होता. त्यानिमित्त इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या एका पोस्टरद्वारे भिंद्रनवाले यांना शहीद असे संबोधण्यात आले होते आणि हरभजनने ती पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर या ऑफस्पिनरवर टीकेची झोड उठली होती.

यानंतर स्पष्टीकरण देताना हरभजनने म्हटले आहे की देशाविरोधात कोणतेही मत त्याला व्यक्त करायचे नव्हते. परंतु आपण त्या पोस्टमधील मजकूर न पाहता घाईघाईने ती शेअर केल्याचे मोठीच चूक घडली. ही चूक मला मान्य आहे आणि मी कोणत्याही प्रकारे त्यातील मतांशी सहमत नाही किंवा त्या विचाराच्या लोकांना माझे समर्थन नाही. मी देशाविरुध्द नाही तर देशासाठी लढणारा शिख आहे. त्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्याबद्दल मी बिनशर्त माफी मागत असून देशविरोधी लोकांना माझे कधीही समर्थन नव्हते व नसेल. मी या देशासाठी २० वर्षे घाम गाळला आहे , आपले रक्त आटवले आहे त्यामुळे देशविरोधी घटकांच्या बाजूने मी कधीच असणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button