‘हारामखोर‘ म्हणजे ‘नाॅटी’.. मग ‘संज्या’ म्हणजे ‘लंगोटी‘ ? निलेश राणेंची टीका

Nilesh Rane - Sanjay Raut

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना हरामखोर असा शब्द वापरल्याने वाद अधिकच चिघळला होता. त्यानंतर हरामखोर याचा अर्थ नॉटी असा होतो, असे सांगत राऊतांनी सारवासारव केली होती. या युक्तिवादावरून भाजपा (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

‘हारामखोर‘ म्हणजे ‘नाॅटी’.. मग ‘संज्या’ म्हणजे ‘लंगोटी‘ ???.. संज्याने परत माती खाल्ली. कंपाऊंडरची औषधे खाऊन खाऊन संज्या ही अवस्था झाली आहे, असा टोला राणे यांनी राऊतांना लगावला आहे.

दरम्यान ,अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली . तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला .यावरून कंगना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात वादंग पेटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER