गणपतीपुळेच्या श्रींच्या मंदिरात हापूसची आरास

गणपतीपुळेच्या श्रींच्या मंदिरात हापूसची आरास

रत्नागिरी(प्रतिनिधी):  रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील गणपती मंदिरात कोकणातील फळांचा राजा हापूस आंब्याची आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली. लॉक डाऊन काळातही भक्तांअभावी श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे नेहमीप्रमाणे पहाटे मंदिर उघडून श्रींची पूजाअर्चा अभिषेक होऊन आरती करण्यात येते.

मंदिरात फुले, मोदक, पणत्या आदी विविध प्रकारे सजावट व आरास करण्यात येते. शुक्रवार, २२ मे रोजी पहिल्यांदाच श्रीला कोकणचा राजा हापूस आंब्याची सजावट व आरास मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER