शरद पवारांनी दिल्या जागतिक साक्षरता दिनाच्या शुभेच्छा

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून जागतिक साक्षरता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .

शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , जागतिक साक्षरता दिन हा मानवी विकास व मानवी हक्कांची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचा आहे. साक्षरता ही मानवाच्या वैचारिक उत्थानासाठी अनिवार्य आहे. देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत साक्षरतेचे हे लोण पोहचावे, यासाठी संघटीत प्रयत्नांचा निर्धार करूया. जागतिक साक्षरता दिनाच्या शुभेच्छा, असे ट्विट पवारांनी केले .

दरम्यान निरक्षर असलेल्या लोकांना साक्षरतेची संधी मिळावी म्हणून ‘युनेस्को’च्या वतीने दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा केला जातो. जगभरातील शैक्षणिक अनुशेष दूर करण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER