गुगलतर्फे भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा

Happy Republic Day to Indians from Google

नवी दिल्ली : गुगलतर्फे भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) खास शुभेच्छा दिल्या. डूडलने खास पध्दतीने भारतातील वेगवेगळी संस्कृतीची झलक दाखवली. २६ जानेवारीला भारतात कशा पध्दतीने प्रजासत्ताक दिनी साजरा केला जातो, हे या डूडलमध्ये दाखवण्यात आले आहे. गुगलच्या होमपेजवर क्लिक करताच गुगलच्या डूडलमध्ये (Google Doodle) भारतातील विविध राज्यातील संस्कृती आणि विविधतेचे दर्शन घडवले आहे.

हे गूगल डूडल एक स्केच एचडी इमेज आहे. या दोन रंगांचा वापर करण्यात आला आहे. हिरव्या आणि लाल रंगांमध्ये ही चित्रे दाखवण्यात आली आहेत. भारताच्या प्रजासत्ताक दिनी गुगलने केलेल्या गुगल डूडलची ही एचडी इमेज मुंबईचे कलाकार ओंकार फोंडेकर यांनी बनवली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुगलची ही डूडलची कलाकृती भारतातील विविधतेतील एकता आणि संस्कृती दर्शवते.

प्रजासत्ताक दिना दिवशी दिल्लीच्या इंडिया गेटवर भव्य परेडचे आयोजन करण्यात येते. ज्या मध्ये देशाच्या थल सेना, नौसेना आणि वायू सेना भाग घेतात. या परेडमध्ये देशाच्या सैन्य ताकदी सोबतच, देशाच्या विविध राज्यातील संस्कृतीची झलक दिसते. या परेडमध्ये देशाच्या विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ हे या दिवसाचे खास वैशिष्ट्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER