नव्या मालिकांचा पर्वणी

Serials

मराठी मालिका विश्वात एक नवा उत्साह आणि नाविन्यपूर्ण मालिकांचा अनोखा काळ सध्या अनुभवयाला मिळत आहे. नव्या-जुन्या कलाकारांच्या सोबतीने सध्या मालिका विश्वात नव्या मालिकांना उधाण आलंय. मार्च पासून आपल्याकडे आलेलं कोरोनाच सावट पण या सगळ्यातून सावरत मोठ्या उत्साहात ” न्यू नॉर्मल ” म्हणत मराठी इंडस्ट्रीत जोरदार काम सुरू झालं आहे. मालिका असोत की चित्रपट मराठी विश्वात नव्याची एक वेगळीच जादू असते. लॉकडाऊन नंतर अनेक वाहिन्या वर नव्या मालिका आपल्या भेटीला आल्या सोबतीला अनेक नवे चित्रपट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत.

कोरोनाच्या भीतीला मागे टाकून पुन्हा जोशात मराठी इंडस्ट्री सज्ज झाली आणि सर्व नियमांच पालन करत शूट ला सुरवात झाली. सगळीच क्षेत्र अनलॉक च्या वाटेवर असताना मराठी सिने- मालिका क्षेत्रात सुद्धा कामाला सुरुवात झाली असून येत्या काळात मराठीत खूप नवनवीन मालिका बघायला मिळणार आहे. या सगळया साठी मराठी कलाकार , दिग्दर्शक , निर्माते मोठ्या उत्साहात कामाला लागले आहेत. सर्व वाहिन्यांनी प्रेक्षकांना नवीन मालिकाची अनोखी मेजवानी देत मनोरंजन हे सुरू ठेवल आहे.

टीव्ही माध्यमातून नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे पण त्याच सोबतीने काही भन्नाट रियालिटी शो देखील या सोबतीने सुरू झाले आहेत. नव्या मालिका सोबत जुन्या मालिकेतून बघायला मिळणारा ट्विस्ट हा सगळ्याचं प्रेक्षकांना आवडतोय. सतत काहीतरी नवीन देणं ही टीव्ही माध्यमाची गरज असते. वाहिन्यांची संख्या वाढल्यामुळे आता स्पर्धाही वाढली आहे. लॉकडाउननंतर प्रेक्षकांना पुन्हा टीव्हीकडे वळवणं हे आव्हानात्मक होतं. तीन महिन्यांपूर्वी मालिका नेमकी कोणत्या वळणावर होती याची उजळणी म्हणून नव्या भागांमध्ये काही संदर्भ घातले गेले. काही रंजक वळणंही आणली. पण, एवढंच पुरेसं नव्हतं. आता मनोरंजनाची नवी इनिंग आणणं ही गरज होती. म्हणूनच नव्या मालिकांची रांग लागली. वैविध्यपूर्ण विषयांसह कलाकार, निर्माते, कथा अशा सर्व बाजूंनी टीव्ही माध्यम कात टाकतंय. या सगळ्यात प्रेक्षकांना नव्या मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे.

मालिका मध्ये विषयांच वेगळेपण अनुभवयाला मिळतंय पण याच सोबतीने या नवलाईत मालिकेतून लोकप्रिय झालेले काही कलाकार देखील छोट्या पडद्यावर बघायला मिळतात. सुयश टिळक, सायली संजीव, मंदार जाधव , आदिनाथ कोठारे असे जुने कलाकार तर आहेत पण नवीन कलाकारांची वेगळीच चर्चा सध्या टिव्ही इंडस्ट्रीत आहे. गिरीजा प्रभू, अक्षया नाईक या सारखे काही नवीन चेहरे मालिका मधून आपल्या समोर आले आहेत.

टीव्हीवर सध्या टीआरपीच गणित संभाळत नव्या-जुन्या कलाकारांचा उत्तम समतोल साधन्यात मराठी वाहिन्या ना यश आलंय. सिनेमा, नाटकांमध्ये प्रस्थापित झालेले काही कलाकार पुन्हा टीव्ही माध्यमाकडे वळले. या कलाकारांनी मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ‘अनुबंध’ मालिकेत नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री स्मिता तांबेनं ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेतून धमाकेदार एंट्री घेतली आहे. ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेनंतर अभिनेत्री वर्षा उसगावकर दहा वर्षांनी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून मराठी मालिकाविश्वात पदार्पण करताहेत. अभिनेता सुबोध भावे आणि मालिकांचं अतूट नातं आहे. ‘तुला पाहते रे’च्या यशानंतर सुबोध ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतून दिसणार आहे. एव्हरग्रीन अभिनेता सुनील बर्वे सध्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात पोहोचलाय. ‘ग्रहण’नंतर सुनील ‘सहकुटुंब…’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. तर ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ ही कौटुंबिक मालिका देणारा दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा मालिकेचं दिग्दर्शन करणार आहे. ‘सुखी माणसाचा सदरा’ ही त्याची नवीकोरी मालिका लवकरच सुरू होणार आहे. भरत जाधवही यानिमित्तानं बऱ्याच वर्षांनी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ही बातमी पण वाचा : मयूरी झाली भावुक !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER