शरद पवार यूपीएचे अध्य़क्ष झाल्यास आनंदच : संजय राऊत

Sharad Pawar - Sanjay Raut

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा चर्चा सुरु प्रसार माध्यमामध्ये सुरु आहे . यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीं.

शरद पवार यूपीएचे अध्य़क्ष झाल्यास आनंदच, मात्र अशा चर्चा सुरु नसल्याचं पवारांचं स्पष्टीकरण, विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मजबूत आघाडी देणं गरजेचं, काँग्रेसला काही निर्णय घ्यावे लागतील , असे संजय राऊत म्हणाले .

दरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांची वर्षभरात चांगलीच गट्टी जमली. राष्ट्रीय स्तरावरही विरोधी अश्याच प्रकारे पक्षांशी मोट बांधली जावी, याकरिता सोनिया गांधी शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया यांचे असल्याचं बोलले गेले . मात्र या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही , असे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केले .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER