खाऊ आनंदे! ( भाग सहा ) ओबेसिटी प्रॉब्लेम आणि मुले

Obesity

जगातील एकविसाव्या शतकातील सगळ्यात मोठे आणि गंभीर असे, लोकांच्या आरोग्यासंबंधी चे आवाहन आहे वजन वाढ ! आणि ही केवळ सुखवस्तू देशातच नाही ,तर कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांमधील,, शहरातून हे प्रमाण खूप वाढते आहे .ही एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

2016 मधील एका संशोधनानुसार पाच वर्षाखालील मुले अंदाजे 41 मिलीयन, लठ्ठपणाची शिकार होती. दुर्दैवाने त्यातील अर्धी ही अशियात तर 25% आफ्रिकेत होती. अर्थात लठ्ठपणाच्या समस्येच्या पाठोपाठ येणारे इतर राक्षस, म्हणजेच हाय बीपी ,डायबिटीस ,हार्ट प्रॉब्लेम हे ही वस्तीला येऊ लागले.

ज्यावेळी लहान मुलेही या लठ्ठपणाची शिकार होतात, त्यावेळी त्यांना फार लहान वयात डायबेटिस चा धोका निर्माण होतो ,ज्याला “Juvenile किंवा टाईप वन डायबेटिस “म्हणतात. वयाच्या चौदाव्या वर्षापूर्वी ज्याची सुरवात होते तो हा डायबिटीस ! 2015 च्या ‘इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन’ चा डाटा नुसार भारतात 97,700 मुले या आजाराने ग्रस्त होती .या T 1 डायबेटीस mellitus चे प्रमाण हे एकूण डायबेटिसच्या रुग्णांच्या 1 ते 3. 61% एवढ आहे.

एवढी आकडेवारी देण्याचा कारणच हे आहे की त्याची तीव्रता कळायला हवी. आज खरंतर प्रत्येक जण आपले वजन कमी करण्याच्या मागे आहे. आणि ते किती कठीण आहे हे प्रत्येकाला माहिती आहे! तरीही त्यासाठी जे करायला हवं ते प्रामाणिकपणे केल्या जात नाही. हेही एक दुर्दैवच ! “सगळं कळतंय पण वळत नाही” ही स्थिती बदलणे आपल्या हातात आहे. सर्वप्रथम आशियाई देशांमध्ये याचं प्रमाण वाढतं का आहे ? हे बघू या.

आशियाई देश पूर्वीपासून त्या मनाने गरीब आणि पूर्णपणे शाकाहारी असलेला, शेतीप्रधान देश आहे .त्यामुळे तेथील लोकांच्या जनुकांची जडणघडण कमी अन्नात जास्त काम करण्याच्या दृष्टीने बनलेली आहे .गेल्या पन्नास वर्षात यामध्ये बदल झाला आणि दर एकरी उत्पन्न वाढले. आवश्यकतेपेक्षा जास्त खाण्याकडे ,तेला तूपा सारख्या कॅलरीज जास्त घेण्याकडे त्यांचा कल वाढला . त्यांची जनुके मात्र त्याला याच्यासाठी परवानगी देत नव्हती. वैद्यकीय भाषेत “थरिपटी जीन्स सिन्ड्रोम”असे म्हणतात.

आजच्या संशोधनानुसार तरी मधुमेह अनुवंशिक असतो. अशाप्रकारच्या जीन्सला खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाची कमतरता यांची ढील मिळाली की मग आपोआपच आणि मधुमेह यांचे स्वागत केल्या जात. आणि मुख्य म्हणजे “आमच्याकडे हेरिडेतरी आहे डायबेटिस”असं म्हणून आपण मोकळा होऊ शकतो.

दुर्दैव हे आहे की आत्ताच्या काळात कमी वयामध्ये होणाऱ्या डायबिटीस ला आम्ही पालकच जबाबदार आहोत. आईवडिलांची खाण्याची, राहण्याची ,फिरण्याची जी पद्धत असते त्यानुसारच साधारण मुलांची पद्धत ठरते. हे एक कारण! दुसरी गोष्ट वाढदिवसाला फक्त औक्षण न करता केक, वेफर्स, तळलेले पदार्थ यांचा भडीमार होतो .आणि तो पद्धत म्हणून सगळेच करतात. त्यामुळे महिन्यातून चार-पाच वेळा असे खाणे होते. मुल कमी जेवले की फक्त डॉक्टर कडे जाऊन लगेच त्याला औषध आणायचे, एवढं झालं की जबाबदारी संपली असं आयांना वाटतं. बक्षीस म्हणून मॅक्डोनाल्ड आणि डॉमिनोज पिझ्झा आमिष दाखवले जाते.. मधल्या सुट्टी साठी सुद्धा वडापाव समोसा याचे ” रेडी टू इट” असेच डबे दिले जातात. गुढीपाडवाही भरपूर खाऊन साजरा होतो तितकाच न्यू इअर डे , आणि तितकाच ख्रिसमससही! एकूणच खादाडी वर जास्त भर असतो.

शरीराला आवश्यक असलेल्या अण्णा पेक्षा अधिक आपण खाल्ले तर त्याचे रुपांतर रक्त मासात होत नाही तर त्याची बनते फक्त चरबी ! याला पण “अति खाण्याने झालेले कुपोषण” असं म्हणू शकतो!

व्यायामाची कमतरता हे ही तितकेच जबाबदार आहे. आजकाल बऱ्याच शाळा अशा आहेत की ज्यांना स्वतःचे ग्राउंड नाही. त्यांचे रुटीन बघितले तर आठ तासांचा कोंडमारा म्हणून शाळा, पुढचे दोन– तीन तास ट्युशन साठी बसणे, ते संपल्यावर टीव्हीसमोर बसणे ,आणि उरलेले सात आठ तास झोप यात मुलांचे शरीर हलतच नाही.

मुलांना असणारा तणाव हा कमी वयात मधुमेह होण्यासाठी असलेले सगळ्यात महत्त्वाचे कारण! आपल्याला प्रश्न पडतो की लहान मुलांना कसला आलाय तणाव? प्रत्यक्षात आज तरी तणावात सगळ्यात जास्त ही लहान मुले भरली जात आहेत. मार्क्स मिळवणे ,त्यासाठीची एवढी स्पर्धा, लहान होत चाललेली कुटुंब, टीव्हीवरील मारामाऱ्या ,घरातील बिघडलेले नातेसंबंध ह्या सगळ्या मध्ये, खळखळून हसणारी आजी आजोबांबरोबर ,आपल्या आते-मामे, चुलत भावंडांबरोबर खेळणारी मुले दिसतच नाहीत.

पुण्यातील तील बाल भवनच्या शोभा भागवत यांनी एक छान गोष्ट शेअर केली .त्या म्हणतात, “एवढ्या 35 वर्षांत मला किंवा बालभवनच्या ताईला एकाही लहान मुलाला साधी चापट लागली नाही. मुलांनी काही वेडेपणा केला तर भीती म्हणून ताई मुलांना माझ्यासमोर आणून बसवतात. मी काय केलं वगैरे विचारते आणि मग त्याच्याशी अर्धा पाऊण तास गप्पा मारते. तेवढ्या वेळात तो जे काय केलं असेल ते विसरूनही जातो, आणि मग परत जेव्हा तायांकडे पाठवते ,तेव्हा ती मुलं म्हणतात ,आम्ही इथेच बसतो. मला आवडले. त्यांना ऑफिस मध्ये येणारे जाणारे, तिथल्या वस्तू हे बघायला खूप आवडत असते. “सांगण्याचा उद्देश असा, त्या म्हणतात की “आजकाल मुलांशी बोलायलाच कोणाला वेळ नाही आहे. आजूबाजूची परिस्थिती ही आपण अशी निर्माण करू देत नाही की जेणेकरून ते हसतील खेळतील आनंदी होतील.”

मुले आपला तणाव वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. नखे खातात ,उदास उदास राहतात .त्यांना सल्ले नको असतात. त्यांना बोलायला हवं असतं .कुणीतरी त्यांचं म्हणणं ऐकावं असं त्यांना वाटतं. त्यांना बोलतं करा. त्यांना खेळ, मॉल असं काही नको असतं. त्यांना फक्त तुमचा वेळ हवा असतो. वाढदिवस साजरे करण्याची पद्धतही आपल्याला बदलता येईल. मुलांसाठी आवश्यक पदार्थ ,समतोल दृष्टिकोनातून ,घरी तयार करून त्यांचे खऱ्या अर्थाने पोषण आपण करू शकतो. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवायला घालण्यापेक्षा ,भरपूर खेळल्यानंतर नैसर्गिक भूक लागते. भूक लागल्यावर माणूस जे पानात पडेल ते हमखास निमूटपणे खातो .हेफक्त आपण लक्षात ठेवायला पाहिजे.

मनसोक्त बागडणारी, मुले खळखळून हसणारी मुले, यांच्यामध्येच आपल्या या पुढील पिढीचे आरोग्याचे रहस्य दडलेले आहे त्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवे.

हाय फ्रेंड्स ! आतापर्यंतच्या आपल्या पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर च्या “पोषण सप्ताहाच्या निमित्ताने “आपण या विषयावर बरीच चर्चा केली. अनेक पैलूंचा आढावा घेतला. परंतू महत्व अर्थात त्यालाच आहे, की आपण ह्या माहिती वर चिंतन-मनन किती करतो? स्वतःच्या आहाराचा आढावा किती घेतो? बदल करण्यासाठी काही हालचाली करतो का?

जागतिक पातळीवरील शास्त्रीय संशोधनाने आता हे सिद्ध झालंय वजन वाढ, मधुमेह, हृदयविकार उच्च रक्तदाब हे विकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी “संतुलित आहार “अतिशय महत्त्वाचा असतो .जीवन शैली सुधारते .शारीरिक शक्ती ,,कृती कार्यक्षमता वाढते. ताणतणाव कमी होतात .शांत झोप लागते आणि आयुष्य स्वास्थ्यपूर्ण आणि निरामय होते.
शास्त्रीय व्याख्याच बघायची तर ,”संतुलित आहार म्हणजे असा आहार ,ज्यात शरीराला आवश्यक सुमारे 42 प्रकारचे अन्नघटक म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट carbs, विटामिन्स मिनरल्स पाणी प्रोटीन फैबर्स, आदीं पुरवणारे पदार्थ योग्य प्रमाणात असतील. हे पाच विभागात विभागता येतील.

१) धान्य आणि त्यापासून बनणारे बनणारे पदार्थ.
२) डाळी आणि कडधान्य.
३) दूध दुधाचे पदार्थ अंडी मांस मासे.
४) फळे आणि भाज्या पालेभाज्या ,शेंगांच्या ,शिरांच्या ,गरांच्या भाज्या. कंदमुळे
५) तेल तूप साखर.

आहाराचं योग्य संतुलन साधण्यासाठी या पाचही गटातील पदार्थांचा समावेश प्रत्येक जेवणात करायला पाहिजे. फक्त साखरेचा मात्र अत्यल्प वापर करावा. संतुलनासाठी आंबट-तुरट खारट कडू गोड या सगळ्या चवी ,आणि अन्नावरील प्रक्रियांच्या सगळ्या प्रक्रिया वापरून होणारा आहार तो संतुलित आहार! यापुढील सगळी जबाबदारी तुमची आणि तुमच्या कल्पकतेची ! लागा तर तयारीला आजपासूनच!!

मानसी फडके
एम.ए.मराठी.
एम एस काऊंसेलिग सायको थेरपी.
एम ए सायकॉलॉजी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER