…याच माझ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Dhananjay Munde

बीडः कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका ही आपणा सर्वांना विनंती आहे. बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे, यातून मुक्त होण्यासाठी सर्वांनी आहेत तिथेच राहून प्रयत्न करावेत, याच माझ्यासाठी या वर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes) आहेत. असे ट्विट (Tweet) करून आमदार धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आहे तिथूनच शुभेच्छा द्या कोणीही भेटायला येऊ नका असे आवाहन केले आहे.

“तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला लढण्याचे बळ देतात, परंतु यावर्षी कोरोनाशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. आपण सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच, कोणीही शुभेच्छा देण्यासाठी येण्याचा प्रयत्न करू नये. कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी,” असे ट्विट धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी केले आहे.

कार्यकर्त्यांनीही आपल्या साहेबांचा आदेश पाळत सोशल मीडियावरूनच मुंजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER