कोविड केअर केंद्रात साजरा झाला 80 वर्षीय आजोबांचा हॅपी वाला बर्थडे

Happy birthday to 80-year-old grandfather celebrated

कोल्हापूर : वाढदिवस म्हंटले की प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. सर्वजण आपल्या प्रियजनांचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रयत्न करत असतात. याचीच प्रचिती कोल्हापूरातील सायबर कोव्हीड सेंटर मध्ये आली. येथील डॉक्टर ,नर्सिंग स्टाफ आणि इतर कोरोनाबाधित रुग्णांनी एका 80 वर्षांच्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवलाय.

कोल्हापूर येथील व्हिजन चारीटेबल ट्रस्टच्या वतीने सायबर कॉलेज इथं उभारल्या गेलेल्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये आजचा दिवस प्रकाश टोपले या आजोबांच्यासाठी खास होता. कारण उजळाईवाडी इथल्या 80 वर्षीय प्रकाश टोपले यांचा आज वाढदिवस होता. दरवर्षी कुटुंबीयांसोबत हे आजोबा वाढदिवस साजरा करत असतात मात्र त्यांना गेल्या 10 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर संताजी घोरपडे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सायबर कॉलेज येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

त्यामुळे ते यावर्षी आपल्या कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करू शकत नव्हते. मात्र हे समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता संताजी घोरपडे आणि डॉक्टर संगीता निंबाळकर यांनी कोविड सेंटरमध्ये या आजोबांच्या वाढदिवसाचं केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं. आजोबांसाठी सुद्धा हा वाढदिवस अविस्मरणीय होता. यावेळी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या कुटुंबीयांना देखील वाढदिवसात सहभागी करून घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER