टीव्हीतल्या हनुमानाला लॉकडाऊनच्या तंगीमुळे विकावी लागली आवडती बाईक

nirbhay wadhwa - Maharashtra Today

मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला. रोजगार गमवावा लागला. सिनेसृष्टी आणि टिव्हीमालिकेतील कलाकारही यातून सुटले नाहीत. टिव्ही सिरीयल्सचे शुटींग ठप्प आहे. अनेक कलाकार रस्त्यावर आले आहेत. एका टिव्ही सिरियल मध्ये हनुमानाची भूमिका करणारा निर्भय वाधवा दीड वर्षांपासून बेरोजगार आहे. पैशांच्या तंगीमुळे त्याला त्याची आवडती बाईक विकावी लागली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना वाधवा याने सांगितले, की जवळपास दीड वर्ष कामाअभावी घरातच बसून राहवे लागल्याने आर्थिक स्थिती नाजूक झाली. लॉकडाऊनच्या काळात माझी सर्व बचत संपली. काम मिळाले नाही. काही पेमेंट बाकी होते, ते बुडाले. माझ्याकडे सुपर बाईक आहे. ती जयपूरमधील माझ्या गावी होती. खर्च भागवण्यासाठी ही बाईक विकण्याचा निर्णय मला घ्यावा लागला. माझ्यासाठी ही बाईक विकणे हे अत्यंत कठीण होते.

ही बाईक मी २२ लाखांना खरेदी केली होती. त्यामुळे ग्राहक शोधणे अवघड होते. शेवटी कंपनीलाच ही बाईक साडेनऊ लाख रुपयांना विकली. निर्भय सध्या ‘विघ्नहर्ता गणेश’ या टिव्ही मालिकेत हनुमानाची भूमिका करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button