…तरीही स्ट्राईक रेटमध्ये विहारी जलदच!

Hanuma Vihari

सिडनी कसोटी (Sydney Test) अनिर्णीत राखण्यात सोमवारी हनुमा विहारी (Hanuma Vihari) व रवीचंद्रन अश्वीन यांनी अखेरची ४३ षटके खेळून काढताना जो लढा दिला, जी जिद्द दाखवली त्याची चर्चा आहे. या खेळीत हनुमा विहारीने १६१ चेंडूत फक्त २३ (नाबाद) धावा केल्या. म्हणजे स्ट्राईट रेट फक्त १४.२८ चा राहिला. ही खेळी अतिशय संथ आणि धावा अगदीच कमी असल्या तरी तिचे मोल कितीतरी फटकेबाज व शतकी खेळींच्याच तोडीचे आहे याबद्दुल वाद नाही. विशेष म्हणजे दुखापतीने धावणेसुध्दा अवघड असताना विहारीने ही खेळी केली हे अधिक कौतुकास्पद आहे.

विहारीचा १४.२८ हा स्ट्राईक रेट (धावा प्रती चेंडू) हा आजच्या घडीला अगदीच कमी वाटत असला तरी भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षाही कमी स्ट्राईक रेटच्या खेळी आहेत. भारतातर्फे सर्वात कमी स्ट्राईक रेटची खेळी अजुनही यशपाल शर्माची आहे. त्यांनी जानेवारी १९८१ मध्ये ॲडीलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुध्दच १५७ चेंडूत फक्त १३ धावा केल्या होत्या. हा स्ट्राईक रेट फक्त ८.२८ पडला. म्हणजे विहारीपेक्षा यशपाल शर्मा यांनी तब्बल ६ च्या कमी स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. आता आपल्याला विहारीची खेळी एवढी संथ वाटते तर शर्मांची खेळी किती संथ असेल?

भारतातर्फे कमी स्ट्राईक रेटच्या खेळी

रेट (धावा/चेंडू) —- फलंदाज ——— ठिकाण – वर्ष
०८.२८ (१३/१५७)- यशपाल शर्मा —- ॲडिलेड – १९८१
१२.७४ ( १३/१०२)- एम.एल.जयसिम्हा -सिडनी – १९६८
१२.८४ (१४/१०९)- राहुल द्रविड ——–मेलबोर्न- १९९९
१४.०३ (१६/११४)- राहुल द्रविड ——- मेलबोर्न- २००७
१४.२८ (२३/१६१)- हनुमा विहारी —— सिडनी – २०२१
१५.०० (२१/१४०)- राहुल द्रविड ——- नागपूर – २००४

या तक्त्यावरून लक्षात येईल की नांगर टाकून खेळण्यात राहुल द्रविड माहिर आहे. म्हणूनच त्याची ‘दी वॉल’ अशी ओळख झाली आहे. या कमी स्ट्राईक रेटच्या सहा पैकी तीन खेळी त्याच्याच आहेत.

दुसरी बाब म्हणजे भारतीय फलंदाजांच्या या सर्वच्या सर्व खेळी ऑस्ट्रेलियाविरुध्द आहेत. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियन्स भारतीय फलंदाजांना चिव्वट खेळी करण्यास प्रेरीत करतात. मात्र यापैकी हनुमा विहारी व यशपाल शर्माच्या खेळीचे सामने सोडले तर इतर चारही सामने भारताने गमावले होते.

आणखी एक नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे यापैकी राहुल द्रविडची नागपूर येथील खेळी सोडली तर इतर पाचही कमी स्ट्राईक रेटच्या खेळी ह्या सामन्याच्या चौथ्या डावात आल्या आहेत. आणि चौथ्या डावातील या चिव्वट खेळींचे काय महत्त्व असते हे हनुमा विहारीने दाखवूनच दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER