वाचलाच तर, त्या बलात्का-याला चौकात फाशी द्या; मनसे आक्रमक

MNS

मुंबई :- पनवेल येथे कोरोना (Corona) क्वारंटाईन सेंटरमध्ये (quarantine center) एका महिलेवर बलात्कार (Panvel Rape Case) झाल्याची घटना घडली. या घटनेचे राज्यात सर्वत्र पडसाद उमटु लागले आहेत. यावरून मनसेच्या (MNS) नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाच होती का?; पनवेल बलात्कार प्रकरणावर चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल  

पनवेलमध्ये क्वारंटाईन सेटंरमध्ये महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीसआली, यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं. अशा बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत ही पहिली शिक्षा, त्यातूनही तो वाचलाच तर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसचे बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाहीच अशा शब्दात शालिनी ठाकरे यांनी आपला राग व्यक्त केला.

या घटनेवर भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya), चित्रा वाघ (Chitra Wagh) आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) यांनीही संताप व्यक्त केला आहेत. आज हे सर्व नेते पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरला भेट देणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER