हाथरसमधील आरोपींना फासावर लटकवा- रामदास आठवले

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना भेटून करणार मागणी

Ramdas Athawale

दिल्ली :- हाथरसमधील अत्याचारप्रकरणावर संताप व्यक्त करताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी चारही आरोपींना फासावर लटकावण्याची मागणी केली. ते म्हणाले, यासाठी मी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेणार आहे.

हाथरसप्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्ष योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारवर टीका करत आहेत. रामदास आठवले यांनी यापूर्वीच या भेटीची माहिती दिली होती. आज एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना आठवले म्हणाले – मी उद्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची लखनौमध्ये भेट घेणार आहे. त्यांच्यासोबत हाथरस घटनेवर चर्चा करेन आणि चारही आरोपींना फासावर लटकवा, अशी मागणी करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER