बलात्काऱ्यांना फाशी द्या; हाथरस बलात्कार प्रकरणी अक्षय कुमारची संतप्त प्रतिक्रिया

Akshay Kumar

मुंबई : उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्कार झाला. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान आज मृत्यू झाला. बलात्कारानंतर मुलीला बेदम मारहाण करण्यात आली होती. तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली – ही क्रूरता कधी थांबणार? गुन्हेगारांना फाशी द्या.

या घटनेवर दुःख व्यक्त करताना अक्षय कुमार ट्वीटमध्ये म्हणाला – ‘संताप आणि मनःस्ताप. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण, कितीही क्रूरता. कधी थांबणार आहे हे सगळे? आपल्या कायद्याने आता अधिक कडक व्हायला पाहिजे की शिक्षा ऐकताच गुन्हेगार भीतीने थरथर कापला पाहिजे. गुन्हेगारांना फाशी द्या. महिलांच्या सुरक्षेसाठी सगले आवाज उठवूया, इतके आपण सगळेच करू शकतो.

उत्तर प्रदेशच्या हाथरस भागात घडली घटना घडली. चंदपा भागात चारा आणण्यासाठी आईसोबत गेलेल्या तरूणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र युवती किंचाळ्यांमुळे नराधम पळून गेले. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रम वीर यांनी सांगितले की या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER