लग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..

nosy relatives

काय मघ कधी ठरतंय लग्न?? तुझा बॉयफ्रेन्ड आहे का??किंवा गर्लफ्रेन्ड आहे का?? असे प्रश्न आपल्या नातेवाईकांकडून किंवा आपले जवळच्यांकडून सतत विचारले जातात. या सततच्या प्रश्नांचा कधीना कधी प्रत्येकालाच त्रास होत असतो. कधी कधी तर डोकेदुखीच व्हायला लागते. खासकरुन मुलींना अशा प्रश्नांचा फार जास्त सामना करावा लागतो. पण आता अशा नातेवाईकांचं टेन्शन सोडा. कारण अशा नातेवाईकांची काळजी कशी घ्यायची याच्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.

relatives

  • तुम्ही आधी अनेक प्रयत्न करुनही समोरची व्यक्ती प्रश्न विचारणं थांबवत नसेल तर तुमच्या पर्सनल बाबींमध्ये लुडबूड करत असेल तर तुम्ही त्यांच्या प्रश्नावर प्रति प्रश्न करु शकता. पण असं करताना समोरच्याला राग येऊ नये याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे जर तुम्हाला कुणी तू लग्न कधी करणार आहेस? असं विचारत असेल त्यांना उत्तर द्या की, “मलाच माहीत नाही? तुम्हीच माझ्यासाठी एखादा लाइफ पार्टनर का शोधत नाही?”.

ही बातमी पण वाचा : लिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…

  • त्यांचा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश जाणून घेतल्यावर तुम्हाला वाटत असेल की, त्यांना उत्तर द्यायला हवं तर जे आहे ते खरं सांगा किंवा केवळ स्माईल देऊन उत्तर देणं टाळू शकता. जर ते केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी प्रश्नांचा भडीमार करत असतील तर तुम्हाला जमेल तितकं गप्प बसा किंवा तुम्हाला काय करायचंय? असा प्रश्नही करु शकता.

  • काही नातेवाईक हे काहीही कारण नसताना प्रश्न विचारतात तर काही नातेवाईकांना उगाचच तुमच्या पर्सनल लाइफमध्ये नाक खूपसायची सवय असते. त्यामुळे त्यांचा हे प्रश्न विचारण्यामागचा उद्देश काय आहे हे आधी समजून घ्या. त्यानंतर तुम्ही ठरवा की त्यावर उत्तर द्यायचं किंवा नाही.

ही बातमी पण वाचा :  अश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..