शरजीलला आमच्याकडे सोपवा, परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही : नितेश राणे

Sharjeel Usmani - Nitesh Rane

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाज (Hindu Community) सडका झालाय म्हणणाऱ्या शरजील उस्मानीला (Sharjeel Usmani) आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही, याची जबाबदारी आमची, असे भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) ट्विटरवर म्हणाले आहेत.

शरजील नावाच्या कार्ट्याला अटक किंवा चौकशी होणार नसेल तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही याची जबाबदारी आमची. एल्गार काय असतो दाखवुन देऊ”, असं नितेश राणे म्हणाले .

शरजील उस्मानी याने पुण्यात 30 जानेवारील रोजी एल्गार परिषदेत भाषण केलं होतं. त्याच्या भाषणातील काही मुद्द्यावर आक्षेप घेत भाजपने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER