महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याने आरक्षण गेले; भाजप नेत्याचा आरोप

Girish Mahajan

जळगाव : राज्यात मराठा आरक्षणावरून पुन्हा वाद पेटला आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता. त्यामुळेच हे आरक्षण गेले, असा आरोप भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. ते शनिवारी जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यात भाजपचे सरकार होते त्यावेळी आम्ही सर्व तांत्रिक बाबी तपासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले.

ते उच्च न्यायालयातही टिकले. दुर्दैवाने आमचे सरकार गेले आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडू शकले नाही. त्यामुळे आरक्षण गेले. आता त्याला भाजप जबाबदार आहे असे म्हणता येणार नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. आघाडी सरकार आणि वकील आपली बाजू मांडण्यास कमी पडले. तसेच तीन पक्षांचे सरकार असल्याने त्यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वादविवाद आणि मतभिन्नता आहे. मंत्रिमंडळातील जवळपास अर्धे मंत्री या आरक्षणाच्या विरोधात आहेत. ते आरक्षण देऊ नको असे म्हणत आहेत. त्यामुळेच आरक्षण गेल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button