गळीत हंगाम निम्यावर : ५०० लाख टन उसाचे गाळप पूर्ण

Half of the crushing season-500 lakh tonnes of sugarcane crushed

सांगली : गळीत हंगाम सुरू होवून अडीच महिने होत आले. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ११९ लाख टन तर राज्यात ५१६ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane) झाले आहे. राज्यात साडेचारशे लाख टन कोल्हापूर विभागात अजून १८० लाख टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. हवामानाने साथ दिल्यास हंगाम एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल असा अंदाज आहे. यंदाच्या वर्षी गाळपाशिवाय ऊस शिल्लक राहणार नाही, असे एकंदर चित्र आहे.

लांबलेला पावसाळा, कोरोनामुळे उसतोडणी कामगारांचा तुटवडा, उसदराची कोंडी, गेल्या अडीच महिन्यांत सतत बदलणारे वातावरण आदीचा परिणाम यंदाच्या गळीत हंगामावर झाला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून १८१ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला. आतापर्यंत ५१६. ५४ लाख टन उसाचे गाळप होवून ५०१.१७ लाख क्विंटल साखरचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.७० तर कोल्हापूर सांगली अव्वल असून ११. २८ टक्के आहे. मागील वर्षीची तुलना करता ०.२ ते ०.३ टक्के उतारा कमी असल्याने टनामागे दोन ते तीन किलो साखर उत्पादनात घट आली आहे. याच गतीने हंगाम सुरु राहिल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात ९५० लाख टन तर कोल्हापूर विभागात सव्वा दोन लाख टन साखरेचे गाळप होण्याचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER