शवपेट्यांच्या जाहिरातीत अर्धनग्न मॉडेल्स! चर्चने व्यक्त केली नाराजी

Half-naked models in coffin ads

पोलंडमध्ये पोलंडमध्ये अंत्यसंस्काराच्या सेवा पुरवणाऱ्या ‘लिंडनेर’ कंपनीने तिच्या शवपेट्यांच्या जाहिरातीत अर्धनग्न मॉडेल्सचा वापर केला. याबाबत चर्चने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘लिंडनेर’ प्रचारासाठी दरवर्षी कॅलेंडर छापत असते. २०२१ च्या ‘कफिन कॅलेंडर’मध्ये शवपेट्यांच्या जाहिरातीत अर्धनग्न मॉडेल्स शवपेट्या ओढत असल्याचे दाखवले आहे. हे कॅलेंडर म्हणजे मृत व्यक्तींचा अपमान आहे, असा आक्षेप अनेकांनी घेतला. चर्चनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मृत्यू आणि सेक्सचा असा संबंध जोडण्यात येऊन नये, असे चर्चने म्हटल्याचे ‘डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तात नमूद केले. यावर कंपनीने स्पष्टीकरण दिले – आमच्या कंपनीची उत्पादने (शवपेट्या) या कोणीही प्राण सोडण्यास तयार होईल अशा आहेत, असा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला. ‘लिंडनेर’ने पहिले कॅलेंडर २०१० साली छापले होते. त्यानंतर बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी अनेक देशांमधील चर्चने या कॅलेंडरचा विरोध केला होता.

मृत्यूला अशा पद्धतीने अपमानित करू नये. मृत्यूला सन्मान दिलाच गेला पाहिजे अशी भूमिका चर्चेने घेतली होती. त्यानंतरही दरवर्षी कंपनी अशी वादग्रस्त कॅलेंडर छापत असते. कंपनीने २०२१ च्या या कॅलेंडरची जाहिरात “१२ वेगवेगळ्या शवपेट्या, १२ वेगवेगळ्या मॉडेल्स… हे आता तुमचं होऊ शकतं” त्यांच्या वेबसाईटवर केली आहे.

२०२१ साठी तयार करण्यात आलेली सर्व कॅलेंडर विकली गेली असल्याची माहिती कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर दिली आहे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER