साडेपाच हजार मतदानकेंद्रे आली तळमजल्यावर

ठाणे :- मतदारांना मतदान करण्यास जातांना अडथळा व अडचणी येवू नये, याकरीता पहिल्या, दुसर्‍या तसेच तिसर्‍या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर आण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ठाणे जिल्हा निवडणूक विभागाने पुढाकार घेत, ठाणे जिल्हा निवडणूक विभागाने 6 हजार 621 मतदानकेंद्रा पैकी 5 हजार 508 मतदानकेंद्रे तळमजल्यावर आणली आली असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात सोमवारी विधानसभा निवडणूकीचा पुर्व तयराीचा माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग, वयोवृध्द मतदारांसह इतर मतदारांना देखिल मतदानाला जातांना अडचण येवू नये, यासाठी पहिल्या, दुसर्‍या तसेच तिसर्‍या मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्यात आली. ठाणे जिल्ह्यात 6 हजार 622 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 5 हजार 508 मतदान केंद्र ही तळमजल्यावर आणली आहेत. तर, 682 मतदानकेंद्रे ही मंडप घालून तयार करण्यात येणार असून ज्या इमारतीत उदवाहकाची व्यवस्था आहे, अशी 251 मतदानकेंद्रेच केवळ पहिल्या, दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर ठेवण्यात आली आहे. तसेच त्याठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास गैरसोय होवू नये याकरीता, जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये पहिल्या मजल्यावर 199, दुसर्‍या मजल्यावर 50 तर, तिसर्‍या मजल्यावर केवळ तीनच केंद्रे असणार असल्याची माहिती ही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : मुखेड: देगाव ग्रामस्थांच्या ठीय्या आंदोलनाने पंचायत समिती विभाग आला ताळयावर..

निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या प्रभागात 1 हजार 500 च्या वर मतदार संख्या असेल त्या ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या संख्येत 113 ने वाढ होणार असून 6 हजार 621 इतकी मतदानकेंद्र इतकी संख्या होणार असल्याचे देखिल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

चौकट : मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करण्यासाठी मतदाराला शासकीय कार्यालयांकडे धाव घेण्याची गरज पडू नये, यासाठी निवडणूक विभागाने 1950 हा टोल फ्री क्रमांक सूरु केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव मतदार यादी असल्याची खात्री करता येणार आहे. त्यामुळे या सुविधेचा मतदारांनी लाभ घ्यावा, व आपले नाव मतदार यादी असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन देखिल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.