भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला; दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदला अटक

hafeej-saeed-arrested-in-pakistan

मुंबई : मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि भारताला हवा असलेला दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारताच्या कूटनीतीचा मोठा विजय झालेला आहे. अखेर भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला आहे.

हाफिज सईदला बेड्या ठोकण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. त्यानंतर पाकिस्तानातील लाहोरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्याने भारताविरुद्ध अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. दरम्यान, यापूर्वीही त्याला दोन वेळा अटक झाली होती. परंतु सबळ पुराव्याभावी त्याची सुटका करण्यात आली होती. आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.