हदगांव : शहरात शारदोत्सव ऊत्साहात संपन्न

आर्यवैश्य महिला मंडळाचा स्तुत्य ऊपक्रम

Nanded

हदगांव तालुका प्रतिनिधी :- येथील आर्यवैश्य महिला मंडळाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे महिलांच्या विवीध स्पर्धा, कार्यक्रम, कुमारीका पुजन, पारायण, कुंकूम आर्चणम् ईत्यादी कार्यक्रमाने श्री शारदोत्सव मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला. या ऊत्सवा दरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरणामध्ये सौ. प्रभावती व्यवहारे यांच्या संकल्पनेतून शासनाच्या तेहतीस कोटी वृक्ष लागवडीला हातभार म्हणून सर्व स्पर्धकांना एक एक वृक्ष भेट देण्यात आले.

या ऊपक्रमासाठी सढळहस्ते मदत करणार्‍या सर्व देणगीदारांचा समाजाच्यावतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. निसर्ग चक्र अबाधित राहून नियमीत पर्जन्यवृष्टी साठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन आवश्यक असल्याचा संदेश देत वृक्षांच्या जोपासनेसाठी नागरीकांना प्रोत्साहन देण्याची योजना तयार केली.

या योजने अंतर्गत दिलेल्या वृक्षाची योग्य जोपासना करणार्‍या महिलांना पुढील वर्षी प्रत्येकी 501 रुपयाचे पारितोषीक देण्यात येईल अशी घोषणा आर्यवैश्य समाजाचे माजी अध्यक्ष शिरीष गो. मनाठकर यानी केली. या ऊत्सवाच्या समारोपानिमीत्त महाआरती घेवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

हदगांव शहरातून श्री शारदा देवीची महिलांच्याच पुढाकारातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी आर्यवैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रभावती व्यवहारे, यांच्यासह सौ. रेवती गंधेवार, साधना पिंगळीकर, छायाताई रायेवार, अनिता चालीकवार, करिणा कवाणकर, प्रतिभा चक्करवार, पुष्पा रायेवार, सविता पिंगळीकर, सरीता मनाठकर, अनिता दमकोंडवार, सुनिता रायेवार, शिल्पा मामिडवार, अंजली दिक्कतवार ईत्यादी भगिनींनी परिश्रम घेतले.