हदगाव : पंधराची माघार, 15 रिंगणात

Hadgaon Assembly Constituency

हदगाव :- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील वैध तीस उमेदवारी अर्जांपैकी 15 जणांनी आपले उमेदवारी अर्ज आज सोमवारी मागे घेतले. आता निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर, काँग्रेसचे माधवराव जवळगांवकर, बहुजन वंचीत आघाडीचे सुदर्शन भारती व अपक्ष बाबुराव कदम यांच्यासह एकूण 15 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सर्व उमेदवारांना आजच चिन्ह वाटप करण्यात आले आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष बाबुराव पाथरडकर, गंगाधर पाटील चाभरेकर, बसपाचे जाकेर चाऊस, अ. समद खाँ हाजी जलाल खाँ, मुस्लीम लीगचे गंगाधर सावते, माधव देवसरकर अपक्ष, रमाकांत शिंदे अपक्ष, नागेश बाबुराव अपक्ष, रंगराव पवार अपक्ष, अशोक राठोड अपक्ष, भारत शेळके अपक्ष, गंगाबाई पानसरे अपक्ष, बालाजी वाघमारे अपक्ष, प्रकाश थाडके अपक्ष, ऊत्तम गायकवाड अपक्ष, हाफीज हैदर शेख अपक्ष या पधरा जणांचा समावेश आहे. तर निवडणूक रिंगणात उभे असलेले माधव निवृत्तीराव पवार जवळगावकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), नागेश बापुराव पाटील आष्टीकर (शिवसेना), डॉ सुदर्शन राम भारती (वंचित बहुज आघाडी), गोविंद सोगाजी तिव्हाळे (रिपब्लिकन बहुजन सेना), सटवाजी दिगंबर नखाते (बहुजन मुक्ती पार्टी), संभाराव उर्फ बाबूराव गुणाजीराव कदम (अपक्ष), चंद्रशेखर उत्तमराव कदम अपक्ष, प्रकाश विठ्ठलराव घुन्नर अपक्ष, रामचंद्र फकीरा राठोड अपक्ष, संतोष मारुती बोईनवाड अपक्ष, अ‍ॅड मारोतराव हुके अपक्ष, श्रीनिवास वैजनाथ पोतदार अपक्ष, अहेमद अब्दुल गफार अपक्ष, त्र्यंबकराव शंकरराव देशमुख अपक्ष व सुर्यभान चव्हाण अपक्ष हे पंधरा जण निवडणूक रिंगणात ऊरले आहेत.