हदगांव : पळसा येथे कार व क्रुझरची समोरासमोर धडक; सुदैवाने काहीजण किरकोळ जखमी

Nanded Car Accident

हदगांव : महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या ढिसाळ नियोजनामुळे अपघाताची मालिका सुरूच हदगाव दि.06, तालुका प्रतिनिधी-आज दि.6 रोजी सकाळी नऊ वाजता हदगाव वांरगा रोडवर पळसा येथुन काही अंतरावर पांडे परीवार भोसी ता.कळमनुरी (कार क्रं एम.एच.20 सि.एस.9510 ) माहुर कडे दर्शनासाठी जात असताना उमरखेड येथील मैड परीवार नांदेड येथे गोदावरी नदीत अस्थी विसर्जन करण्यासाठी क्रुझर (क्रं एम.एच.29 ऐ.आर.2083) ने जात असताना या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात क्रुझर रस्ताच्या खोल जाऊन पडली .

नांदेड: स्थायी समितीच्या बैठकीत नुतन जि.प.अध्यक्षा सौ.अंबुलगेकर यांनी धरले अधिका-यांना धारेवर

घटनास्थळी पळसा येथील युवकांनी तात्काळ येवून जखमींला बाहेर काढून त्यामध्ये किरकोळ जखमी व्यक्तींना तात्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले असून घटनास्थळी भेट देऊन मनाठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंढे यांच्या नियंत्रणाखाली पुढील तपास करीत आहेत.

नागपूर- तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून कामच बंद तर कधी संथ गतीने काम सुरू असल्याने व जागोजागी पर्यायी वळणे आणि व्यवस्थेत एक बाजू कोणतीच पुर्ण झाली नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून यात अनेकांना जिव गमावावा लागला आहे तर काही गंभीर जखमी झाल्याने परीणाम भोगावे लागले आहे. पर्यायी वळणाची रस्ते सुटसुटीत व थोडी पक्की करण्याची मागणी होत आहे.