…तर तमाम हिंदुस्थानवासी खूश झाले असते; निलेश राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका

nilesh Rane - Shivsena - Maharastra Today

मुंबई :- आज सायंकाळी ५ वाजता शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमिपूजनाचं आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांना वगळून इतर कोणत्याही दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. सध्या या मुद्द्यावरून विरोधकांनी शिवसेनेला चांगलेच घेरले आहे. आणि अशातच माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

ज्या बाळासाहेबांनी लाखोंच्या सभा गाजवल्या त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार. बाळासाहेबांच्या स्मारकाची जागा पण मुंबईकरांकडून चोरली. मुंबईचं (Mumbai) घर ओसाड पडलं आहे, बाळासाहेबांचं स्मारक तिकडे झालं असतं तर तमाम हिंदुस्थानवासी खूश  झाले असते, असे म्हणत निलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

दरम्यान, निलेश राणे यांचे बंधू नितेश राणे यांनीही शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मनं खूप लहान झाली आहेत!” तसेच यावेळी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही आमंत्रण न देण्यावरून आश्चर्य व्यक्त केलं आहे. “नगरविकास मंत्री एकनाथ यांनाही निमंत्रण कसं नाही? प्रोटोकॉल? आश्चर्य”, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर उपरोधिक टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button