गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द झाले नसते; फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis - Gopinath Munde

मुंबई :- भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीट Postal Envelopeचे अनावरण झाले. या निमित्ताने गोपीनाथ गडावरून ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या आठवणी जागवल्या. तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून भाजप (BJP) नेते फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका केली.

यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda), केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले. आघाडी सरकारमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. नेत्याचे डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्राचे आभार मानून गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सत्तेसोबत संघर्ष हा गोपीनाथांचा स्थायिभाव
काही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात. पण त्यांचे कार्य असामान्य असते. गोपीनाथ मुंडे हे त्यापैकीच एक होते. ते नेहमी सांगायचे की, सत्तेशी तडजोड केली तर आपण कधीही नेता बनू शकत नाही. सत्तेसोबत संघर्ष केलात तर तुम्ही नेता बनू शकता. सत्तेसोबत संघर्ष करणे हा त्यांचा स्थायिभाव होता, अशा शब्दात फडणवीसांनी गोपीनाथांच्या आठवणींना उजाळा दिला.

गोपीनाथ मुंडे यांनी अधिक काळ विरोधी पक्षात घालवला. पुढे ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले. त्यांनी मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत संपवली. गोपीनाथ मुंडे सत्तेत असोत वा नसोत, त्यांचा एक रुबाब कायम होता. मुंडेंना पाहून लोकांना विश्वास वाटायचा. त्यांनी केंद्रीय राजकारणातही आपली चमक दाखवली. म्हणूनच पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांच्याकडे ग्रामविकासचे खाते होते. पण नियतीला वेगळेच काही मान्य होते. मुंडेसाहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे फडणवीसांनी सांगितले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button